आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सुनील वळसे पाटील, कार्याध्यक्षपदी राजू आढळराव पाटील, सचिव अनिल देसले यांची मंचर येथे बिनविरोध शनिवार दि.१४ रोजी निवड झाली.
मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आंबेगाव तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सभा झाली.यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त ए.एफ. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.यावेळी गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका,विस्तार अधिकारी शैला निमसे यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.यावेळी बिनविरोध निवड करण्यात आलेली कार्यकारीणी पुढीलप्रमाणे-संघाचे अध्यक्ष सुनिल वळसे पाटील,कार्याध्यक्ष राजू आढळराव पाटील ,उपाध्यक्ष नितिन बाणखेले, प्रकाश इंदोरे,सचिव अनिल देसले, सहसचिव कांताराम टाव्हरे,खजिनदार निशाद मोमीन ,सदस्य उज्वला भालेराव, सुरेश जारकड,आनंद कोकणे, दत्तात्रय काळे, भगवान माळवे,जिल्हा खजिनदार विनोद बोंबले,जिल्हा कौन्सील सदस्य अविनाश ठाकूर,राजू आढळराव पाटील,अनिल देसले या प्रमाणे आहे.




