दत्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पाणी पिण्याची पिंप भेट व खाऊ वाटप


उरुळी कांचन – प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता. हवेली) दत्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाणी पिण्याची पिंप तसेच खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी शाळेला भेट देऊन हा उपक्रम यशस्वी केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कुदळे, खेडेकर मॅडम, खेडेकर सर, एकनाथ ताम्हणे, शिवाजी कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध करून देत खाऊ वाटप करण्यात आले. शाळेला स्वतंत्र खेळाचे मैदान नसल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेकडे अधिकृत निवेदन सादर करून शाळेसाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अनिल कदम यांनी दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.