निरगुडसर येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ


भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अ‍ॅक्सेंचर व WE-Act यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्रामपंचायत कार्यालय निरगुडसर आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पुणे – जिज्ञासा लोकसंचालीत साधन केंद्र मंचर यांच्या सहकार्याने निरगुडसर येथे महिलांसाठी “ऍग्रो मिलेट्स अँड फूड प्रोसेसिंग प्रॉडक्ट्स – मसाला प्रोसेसिंग” या विषयावर २० दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा उद्देश महिलांना उद्योगातील आवश्यक कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास प्रदान करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्या समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका बजावतील. उद्घाटन समारंभात ग्रामपंचायत कार्यालय , निरगुडसर गावचे विद्यमान सरपंच रवींद्र वळसे पाटील, माजी उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य सारीका कडवे, जिज्ञासा लोकसंचालित व्यवस्थापिका मनिषा जारकड, रिना वायकर, सुप्रभा पिंगळे, निवेदिका मनीषा वळसे, संगीता थोरात, सुंनदा टाव्हरे, प्रोजेक्ट ऑफिसर भगवानजी हरकळ, सचिनजी मोरे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.