महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समितीच्या हवेली तालुका प्रतिनीधीपदी दिलीप गाडेकर यांची नियुक्ती


उरुळी कांचन – प्रतिनिधी

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती, किल्ले वाफगाव यांच्या वतीने हवेली तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून दिलीप भाऊ गाडेकर (उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती समिती प्रमुख श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.

गाडेकर यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा विचार करून त्यांची ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सवाचे आयोजन यशस्वी होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून गाडेकर यांचे अभिनंदन होत असून, त्यांनीही समितीच्या कार्यात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत वतीने महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समितीत दिलीप गाडेकर यांची हवेली तालुका प्रतिनिधीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, इतिहास अभ्यासक खलिल शेख, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, जितेंद्र बडेकर, राजेंद्र कांचन, विपुल कोतवाल, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.