
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत दिपावलीनिमित्त सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांना वाटप करण्यात येणा-या साखरेच्या धोरणात दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे सुचनेनुसार शेतक-यांच्या भावना लक्षात घेवून धोरणात बदल करून खालीलप्रमाणे साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना बेंडे म्हणाले की धोरणात झालेल्या बदलानुसार साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी राहील. त्यामध्ये (१) पूर्ण व अपूर्ण शेअर्स रक्कम जमा केलेले व ऊस पुरवठा केलेले – ८० किलो (२) फक्त पूर्ण शेअर्स (रु. १५,०००/-) रक्कम जमा केलेले – ६० किलो (३) फक्त ऊस पुरवठा केलेले – ६० किलो (४) अपूर्ण शेअर्स रक्कम जमा केलेले – ५० किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे. आजपर्यंत पारगाव, निरगुडसर, जांबूत, कळंब, रांजणी, मंचर गटातील गावामध्ये साखर वाटप झालेले आहे. तथापी दि. ६ ते दि. १० ऑक्टोबर कालावधीतील नियोजित साखर वाटप पूर्ण झाल्यानंतर दि. ११ ते १५ ऑक्टोबर कालावधीत वाटप झालेल्या गटातील गावांमध्ये साखर वाटप करण्यात येईल.
मंगळवार दि. ६ – घोडेगाव गटातील सर्व गावे,
बुधवार दि. ७ – टाकळी हाजी, कवठे व करंदी गटातील सर्व गावे,
गुरुवार दि. ८ – करंदी गटातील गावांसाठी गट ऑफिस,
शुक्रवार दि. ९ – जातेगाव, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव गट,
ओझर, उंब्रज या गटातील गावांसाठी गट ऑफिस येथे,
खोडद व पारगाव (मंगरूळ) गाव येथे,
शनिवार दि. १० – जातेगाव बु, भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव
अंतर्गत सबंधित साखर वाटप गावांसाठी गट ऑफिस येथे व
खेड गटातील गावांसाठी मार्केट यार्ड खेड येथे,
रविवार दि. ११ – पारगाव गटातील सर्व गावे,
मंगळवार दि. १३ – पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील सर्व गावे,
बुधवार दि. १४ – निरगुडसर गाव, कळंब व रांजणी गटातील सर्व गावे,
गुरुवार दि. १५ – मंचर गटातील सर्व गावे,
जे सभासद / ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आपआपले गावामधून साखर घेवू शकणार नाहीत त्यांना साखर शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर ते शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीमध्ये कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत (गुरुवार व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) वाटप केली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२७ पर्यंत कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत (गुरुवार व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) साखर वाटप करण्यात येणार आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला साखर घेताना सभासद व ऊस उत्पादकांनी त्यांना दिलेले स्मार्ट कार्ड व ओळखीचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. तरी वरील नमूद तारखेला सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेवून जाणेचे सहकार्य करावे. वरील धोरण चालू वर्षाकरिताच मर्यादित आहे. सर्व शेअर्स धारकांना विनंती आहे की आपले शेअर्सची अपूर्ण रक्कम कारखान्याकडे जमा करावी. अन्यथा पुढील वर्षी धोरणामध्ये बदल करावा लागेल असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.



