कोंढवळे येथील कवयित्री अलका भवारी यांची चला पंढरीला जाऊ हि सुंदर कविता


चला पंढरीला जाऊ

चला पंढरीला जाऊ,
चला पंढरीला जाऊ;
रूप विठूचे आपण,
डोळे भरून हो पाहू. ॥१॥

चंद्रभागा नदीतिरी,
घेऊ हरीचे दर्शन;
पंढरीच्या वाटेवर,
पांडुरंग आकर्षण. ॥२॥

विठू सावळा भेटावा,
हीच लागलीय आस;
मुखी अखंड नामाचा,
मनी धरलाय ध्यास. ॥३॥

उभा श्रीहरी सुंदर,
शोभे कर कटीवरी;
बघा रुक्मिणी रुसली,
उभी हरीच्या शेजारी. ॥४॥

नाद टाळ-मृदंगाचा,
कानी पडला मधुर;
माझ्या गोविंदाचे बघा,
रूप दिसे मनोहर. ॥५॥

कवयित्री : अलका भवारी / कोंढवळ