काठापूर बुद्रुक येथील शालेय विद्यार्थ्यांना लायन्स क्लब आकुर्डी अग्रसेन यांच्या माध्यमातून सायकलचे वाटप


जगातील २१० देशांमध्ये समाजसेवेचे काम सुरू असलेल्या लायन्स क्लब या नामांकित संस्थेच्या माध्यमातून काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले . लायन्स क्लब ही संस्था नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यांनी विविध शाळा, विद्यार्थ्यांना मोठी मदत केली आहे. लायन्स क्लब आकुर्डी अग्रसेन यांच्या वतीने सायकल बँक योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. असे मत माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष मोहन गर्ग, झेड.सी.मिनांजली मोहीते, खजिनदार पवन अग्रवाल, माजी अध्यक्ष राजेंद्र गुप्ता, अशोक बंसल, हिमांशू गुप्ता, अरुणा गुप्ता, के.के. गोयल, पवन गर्ग, लक्ष्मीनारायण अग्रवाल, गजानन अग्रवाल, सतीश जाधव, शिव अग्रवाल, कमलेश गर्ग, अरुणा गुप्ता, ललिता गुप्ता, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे, मुख्याध्यापक नंदकुमार चासकर उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लबच्या माध्यमातून जगातील २१० देशांमध्ये समाजसेवेचे काम सुरु असल्याचे मिनांजली मोहिते यांनी सांगीतले लायन्स क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात असे मोहन गर्ग म्हणाले. यावेळी रामदास वळसे, भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे , बाळासाहेब घुले, माउली अस्वारे, सरपंच अशोक करंडे, उपसरपंच पुनम करंडे, विशाल करंडे, अमोल करंडे, कुंडलिक जोरी, एकनाथ ढमाले, अध्यक्ष राहुल भुरके, उपाध्यक्ष काळुराम टिंगरे, रोहिदास तुळे, सागर जाधव, राजु जोरी, अशोक जोरी, किशोर करंडे, सोमनाथ जाधव यांसह ग्रामस्थ व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.