चंदीगड येथे झालेल्या पारंपारिक धनुर्विद्या स्पर्धेत गावडेवाडी येथील प्रतीक निघोट याचा पुरूष गटात तिसरा क्रमांक


भारतातील पहिली ‘पारंपरिक धनुर्विद्या स्पर्धा’ (Traditional Archery Championship) दिनांक १८ ते २० एप्रिल रोजी चंदीगड येथे पार पडली. त्यात आदर्शगाव गावडेवाडी येथील प्रा. प्रतिक दत्तात्रय निघोट यांनी पुरुष गटात तिसरा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत एकूण २८ फेऱ्या खेळवल्या गेल्या. या फेऱ्यांमध्ये भूतानी टारगेट ( १४० मीटर) , कोरियन टारगेट( ९० मीटर), तुर्कीश पुटा टारगेट ( ७० मीटर), लडाख डामनाक टारगेट ( ४० मीटर), 3D टारगेट ( २० मीटर), कझाख झांबी टारगेट ( ३० मीटर), भारतीय आदिवासी टारगेट ( ३० मीटर) इत्यादी लक्ष्यांचा वेध घेतला गेला. इंडोवेदिक ट्रॅडिशनल आर्चरी असोसिएशन द्वारा आयोजित या स्पर्धेत देशभरातल्या विविध राज्यांमधून तसेच जर्मनी, स्लोवाकिया आणि नॉर्वे या देशांमधील ४४ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रतिक याने अंतिम फेऱ्यांमध्ये ४२, ७०, ६४ आणि २९ असे गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकवला. त्यांनी स्वतः बनविलेले धनुष्य आणि बाण वापरून ही कमाल केल्याने त्यांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.

आपल्या या यशात आई-वडील दत्तात्रय आई अलका निघोट काका मनोज निघोट काकी संचिता आणि निघोट बबनराव नि घोट व झुंबराबाईं निघोट यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतीक सांगतो .
भारताला पारंपरिक धनुर्विद्येचा हजारो वर्षांचा इतिहास असून देखील ही विद्या लोप पावलेली आहे. धनुर्विद्येच्या पुनरुज्जीवनासाठी प्रतिक हे गेली पाच वर्ष सतत प्रयत्न करत आहेत. ते वसिष्ठ धनुर्वेदाचा सखोल अभ्यास करून धनुष्यबाण बनविणे तसेच चालवण्याची कला आत्मसात करत आहे. धनुर्विद्या ही फक्त शस्त्रविद्या नसून मानसिक एकाग्रता व स्वयंशिस्त हे देखील त्याचे महत्वाचे पैलू आहेत. भारतीय ज्ञान परंपरा मिशन अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात धनुर्विद्येचा समावेश होणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा प्रतीक निघोट व्यक्त करतो. आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील प्रतीक निघोट याने धनुर्विद्येत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला )