कोलतावडे, निरगुडसर येथे आज कळमजामाता देवीचा यात्रा उत्सव


प्रमोद दांगट 

कोलतावडे निरगुडसर ता. आंबेगाव येथील कळमजामाता देवीचा यात्रा उत्सव बुधवार दिनांक ३० रोजी आयोजित करण्यात आला असून या उत्सवासाठी कोलतावडे निरगुडसर व पंचक्रोशीतील भाविक भक्त, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ कोलतावडे निरगुडसर यांच्यावतीने करण्यात आले आहे. बुधवार दिनांक ३० रोजी सकाळी सात वाजता देवीची महापूजा, आठ वाजता मांडव डहाळे, दुपारी बारा ते चार भजन, सायंकाळी पाच ते सात हारतुरे व शेरनी मिरवणूक, सायंकाळी सात ते आठ वाजता सत्कार समारंभ, रात्री आठ वाजता महाप्रसाद रात्री नऊ ते अकरा देवीची पालखी मिरवणूक व रात्री अकरा वाजता जगनकुमार वेळवंडकर सह हौसाराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा संपन्न होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या नियोजित कार्यक्रमासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.