केसनंद – कोरेगावमुळ जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांच्या जनसंवाद संपर्क दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद


उरुळी कांचन – प्रतिनिधी

जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील, वारकरी विचारांच्या, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे व गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा करत विकासाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोचवणारे, विविध सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत सामाजिक बांधिलकी जपणारे राजकारणात समाज कारणाची नाळ जपत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा व विकासाचा ध्यास असणारे प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध उद्योजक रमेश हरगुडे व ग्रामपंचायत सदस्या सुरेखा रमेश (बापु) हरगुडे यांच्यासह सर्व सहकारी, मार्गदर्शकांच्या माध्यमातून केसनंद गावचा विकासाचा आलेख उंचावत राहिला आहे.

केसनंद ग्रामपंचायत सदस्या व कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा केसनंद – कोरेगावमुळ जिल्हा परिषदेच्या गणातील संभाव्य उमेदवार सुरेखा रमेश (बापु) हरगुडे यांनी समाजसेवेचा वारसा जपला असून समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून जिव्हाळ्याचे व माणुसकीचे नाते निर्माण केले. सध्या कोरेगावमुळ, टिळेकरवाडी, खामगाव टेक, भवरापूर, श्रीप्रयागधाम याठिकाणी गावभेट जनसंवाद संपर्क साधला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या जनसंवाद संपर्क दौऱ्यास जेष्ठ नागरिक, महिला, युवती, तरुण यांच्याशी उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेला दोन टप्प्यांत काढण्यात आलेल्या यात्रेला केसनंद–कोरेगावमूळ जिल्हा परिषद गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.