कोरेगावमुळ पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार कृषीराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन


उरुळी कांचन – प्रतिनीधी

कर्तृत्व, दातृत्व, वक्तृत्व, निष्ठा आणि माणुसकी या पंचगुणांच्या संगमावर उभे असलेले गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून कोरेगावमुळ पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार कृषीराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी यांच्याकडे पाहताना मन आनंदाने आणि प्रेमाने भरून येते. हवेली तालुक्यातील नायगाव येथील सामाजिक, राजकीय, कृषी, सहकार, कला, शैक्षणिक, आध्यात्मिक वसा आणि वारसा लाभलेल्या कुटुंबातील कोरेगावमुळ पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार कृषीराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी यांनी जनमानसाशी नाते जोडत, कोरेगावमुळ पंचायत समिती गणात प्रेम मिळवून गणातील जेष्ठ नागरिक, महिला, तरुण, युवतीशी संवाद साधत मित्रपरिवार व तालुक्यातील जेष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या टप्प्यांत ‘जन आशीर्वाद यात्रा’ ‘श्री सप्तशृंगी निवासिनी देवी वणी’, ‘श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर’, ‘श्री.विघ्नहर ओझर’ अशाप्रकारे यात्रा सोमवार दि.२९ डिसेंबर २०२५ ते दि.३० डिसेंबर २०२५ अशी दोन दिवसांची असणार आहे.

पंचायत समिती गणातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. यात्रेमध्ये सहभागी भाविकांची काळजी स्वयंसेवक चांगल्या प्रकारे घेत आहे. हा क्षण म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात यासाठी आपला सहभाग आणि आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांगीण विकासाची सुरवात आहे. प्रत्येक मतदाराशी संवाद साधणे, त्यांच्या समस्यांना समजून घेणे आणि सोबत वाटचाल करणे हेच माझे ध्येय. तुमच्या आवाज आम्ही ऐकतो आणि तुमच्या विकासासाठी सदैव सेवक या नात्याने कार्य करत राहिल असे बोलताना कृषीराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी यांनी सांगितले.