ॲन्टिकरप्शन आपल्या दारी’ जिल्ह्यातील २६ गावांमध्ये उपक्रम


शासनाच्या कार्यालयातील भष्टाचाराला लगाम लावणे तसेच अॅन्टिकरप्शन कायद्याची जनजागृती व्हावी या पार्श्वभूमीवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अॅन्टिकरप्शन ) चांगलीच कंबर कसली आहे. जिल्ह्यातील २६ गावांमध्ये ‘ॲन्टिकरप्शन ब्यूरो’ आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे,” अशी माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली.

शासकीय कार्यालयातील भष्टाचार आणि लोकांची पिळवणूक रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवार (ता. १३) ते गुरुवार (ता. १६) दरम्यान ‘ॲन्टिकरप्शन ब्यूरो आपल्या दारी’ हा उपक्रम होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सासवड, जेजुरी, नीरा, वडगाव मावळ, लोणवळा, खेड, चाकण, बारामती, मोरगाव, वाघोली, शिक्रारापूर, शिरूर, आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव, मंचर, भिगवण, इंदापूर, लोणीकाळभोर, दौंड, यवत, भोर, राजगड, वेल्हा, पिरंगुट, पौड या २६ गावांचा समावेश आहे. या गावांसाठी नियोजीत वार ठरविले आहेत. यावेळी लोकांच्या अडचणी जाणून घेऊन अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दरम्यान, लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर रकमेशिवाय अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ ‘ॲन्टिकरप्शन ब्यूरो’ला तक्रार द्यावी. त्या अनुषंगाने पुढील कारवाही केली जाणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी सांगितले.
सदर कार्यवाही चे अनुषंगाने आज खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांना अँटी करपशन पोलीस उप अधीक्षक श्री. सतीश वाळके आणि स्टाफ यांनी भेटी देऊन ग्रामस्थ तसेच शेतकरी यांचे भेटी घेण्यात आल्या त्यांना पॅम्प्लेट वाटप करण्यात आले असून त्यांचे काही तक्रार असलेस तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधन्याच्या सूचना देण्यात आल्या.