कोरा चेक दिल्याचे सिद्ध करा चेअरमन यांचा तात्काळ राजीनामा घेतो ; वळसे पाटील यांचे निकम यांना आवाहन


देवदत्त निकम यांनी काही दिवसापूर्वी विधानसभा, लोकसभा निवडणूक काळात भीमाशंकर कारखान्याच्या वतीने भाग निधीत असलेल्या पैशांचा वापर मर्जीप्रमाणे करण्यात आला .अनेकांना आचारसंहितेच्या काळात सही करून कोरे चेक देण्यात आले होते. आम्ही सांगू त्यावेळेस चेकवर तारीख टाका असे सांगून निवडणूक संपल्यावर चेक वटवण्यात आले. असा आरोप देवदत्त निकम यांनी केला होता. या आरोपाची खिल्ली उडवत वळसे पाटील म्हणालेआतापर्यंत भीमाशंकर कारखान्याने कोणालाही कोरा चेक दिला नाही. दिले असेल तर ते सिद्ध करा .लगेच कारखान्याचे अध्यक्ष यांचा राजीनामा घेतो .असे आव्हान निकम यांना दिले.

राज्यभरात अनेक सरकारी व खाजगी साखर कारखान्यांची परिस्थिती खराब असून आजच्या तारखेपर्यंत अनेक कारखान्यांनी एफ आरपी रक्कम सुद्धा दिलेली नाही. भविष्यकाळात साखर कारखान्यांना अनेक अडचणी उद्भवू शकतात. या अडचणींना आपल्याला तोंड द्यायचे आहे. त्यामुळे आपल्या भीमाशंकर साखर कारखान्याकडे असलेल्या सर्व पैसा वाटून टाकला तर भविष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड कसे देणार .असा प्रश्न माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी
उपस्थित केला.

पारगाव दत्तात्रयनगर ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची २९ वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे होते. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे,शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा ,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे ,आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर ,अक्षय काळे, बाजीराव बारवे,सिताराम लोहट, ज्ञानेश्वर अस्वारे , पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले,नितीन वावळ, रामहरी पोंदे,पोपटराव थिटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, टेक्निकल जनरल मॅनेजर शिरीषसुर्वे ,प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे,चीफ अकाउंटंट राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टिलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, लेबर अँड वेल्फेअर ऑफिसर सुरेशराव शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे नेते आणि ऊस उत्पादक शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आपल्या शेजारील घोडगंगा साखर कारखाना बंद पडला आहे. जिल्ह्यातील व राज्यातील अनेक कारखान्यांना एफ आर पी रक्कम देता आली नाही. साखर आयुक्तांनी एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांना दिल्याशिवाय यावर्षी कारखाना सुरू करण्यास परवानगी देणार नाही .अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपण ही परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे .देश पातळीवर पाहिले तर देशात उसाची लागवड कमी झाली आहे .मागील वर्षी पाऊस कमी झाला पण ऊस मिळाला. यावर्षी पाऊस चांगला आहे परंतु ऊस लागवडीचे प्रमाण घटले आहे. राज्यातील विविध सहकारी आणि खाजगी कारखान्याने त्यांची गाळप क्षमता वाढवत आहे. कमी दिवसात जास्त गाळप करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कारखाने काम करत आहे. कमी दिवसात जास्त उसाचे गाळप झाल्यास ज्या कारखान्यांची गाळप क्षमता कमी आहे .त्यांना ऊस मिळणे अवघड होईल व त्या कारखान्यांवर संकट येईल असेही वळसे पाटील म्हणाले. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे प्रास्ताविकात म्हणाले कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वाटचाल दमदारपणे चालू आहे. आजूबाजूचे साखर कारखान्यांची अवस्था दयनीय झाली आहे .त्या तुलनेत भीमाशंकरची वाटचाल आर्थिक दृष्ट्या खूप चांगली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे . परंतु शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढीकडे फारसे लक्ष नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चर्चेत प्रभाकर बांगर, तुकाराम गावडे, संजय बढेकर, संभाजी चव्हाण, किरण ढोबळे ,गणेश यादव, विशाल ढोबळे ,माऊली काळे, एडवोकेट बाळासाहेब बाणखेले यांनी भाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली.अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सुदाम खिलारी,निलेश पडवळ.तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष एडवोकेट प्रदीप वळसे पाटील यांनी मानले.

कारखान्याला नऊ कोटी रुपये तोटा झाला असता – बाळासाहेब बेंडे अध्यक्ष भीमाशंकर कारखाना

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहून त्यांना चांगला दर देत आहे .मात्र काही जण कारखान्याकडून कमी दर दिला जात असल्याचा गैरसमज निर्माण करतात. यामागे त्यांचा छुपा अजेंडा आहे.मागील वर्षी विरोधकांनी ३३२५ रुपयांनी भाव द्यावा. अशी मागणी केली होती. हा भाव दिला असता तर कारखान्याला ९ कोटी ७८ लाख रुपयांचे नुकसान झाले असते. त्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले असते आणि कारखाना आजारी पाडण्याचे काम काहीजण करत आहे.

दैवत आता कुठे आहे. – बाळासाहेब बेंडे अध्यक्ष भीमाशंकर साखर कारखाना.

यापूर्वी कारखान्याचे अध्यक्ष पद अनेकांनी भूषवले, वळसे पाटील
त्यांच्या घरातील कोणालाही अध्यक्षपद देणे शक्य होते . वळसे पाटील साहेबांचे ज्येष्ठ बंधू प्रतापराव वळसे पाटील यांना अध्यक्ष होण्याची इच्छा होती .मात्र वळसे पाटलांनी त्यांची समजूत घालून देवदत्त निकम यांना अध्यक्ष केले. ज्यावेळी त्यांना अध्यक्ष केले. त्यावेळी वळसे पाटील माझे दैवत आहे. त्यांचा फोटो घरात लावला व आता मात्र फोटो काढून टाकला. हा सर्व मतलबीपणा आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी कारखान्यात भ्रष्टाचार केला…….

भीमाशंकरकारखान्याविषयी गैरसमज पसरवले जातात. कारखान्याचा पैसा निवडणुकीसाठी वापरला असे आरोप केले जातात. दिलीप वळसे पाटील यांनी कारखान्यात भ्रष्टाचार केला. असे आरोप केले जातात. मात्र एवढे वर्ष मंत्रिमंडळात काम करताना विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील एकही नेत्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. वार्षिक सभा म्हणजे सभासदांची सभा असते. कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांनी जो कारभार केला आहे .जे निर्णय घेतले आहे .त्याला मान्यता आहे का ? याबाबत सभासदांनी उत्तरे देऊन प्रश्न विचारायचे असतात. गेल्या वर्षी कारखान्याच्या वार्षिक सभेत एका संचालकानेच प्रश्न विचारून सभेत गोंधळ घालने नियमाला धरून नाही.