उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या लोकहिताचे कार्यक्रमासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दमदार नेते मा. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – शुभेच्छुक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चेअरमन, व्हाईट चेअरमन, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सांस्कृतिक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी आंबेगाव तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात २२ ते ३० जुलै या दरम्यान जनविश्वास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यात सुद्धा जनविश्वास सप्ताह दरम्यान वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, युवा संकल्प शिबिर, महिला सक्षमीकरण मेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वळसे पाटील यांनी जनविश्वास सप्ताहाची माहिती दिली. ते म्हणाले मंगळवार दि. २२ नालंदा इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले जाणार आहे. बुधवार दि. २३ शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोणी येथे होईल. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार दि. २४ लांडेवाडी येथे वृक्षारोपण होईल. कळंब, पारगाव, टाकळी हाजी, रांजणगाव, मंचर, भराडी, खडकी, चांडोली बुद्रुक, पाबळ, पारगाव तर्फे खेड, डिंभें, काठापुर, वळती, थोरांदळे , पिंपळगाव तर्फे महाळुंगे या गावांमध्ये विविध दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २७ रोजी मंचर येथे युवा संकल्प शिबिर होणार असून शहरातून रॅली काढत शिवगिरी मंगल कार्यालयात गणेश शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार दि ३० रोजी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिर तसेच लांडेवाडी येथे मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरण मेळावा होणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे, बँकेचे संचालक अजय घुले, दत्ता थोरात, माजी सभापती सुभाष मोरमारे, सभापती निलेश थोरात, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, वैभव उंडे आदी उपस्थित होते.