पंढरपूर येथील महाद्वार घाटावरून झाले बेपत्ता ; पंढरपूर पोलिसांकडून शोध सुरू
पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी गेलेले काठापुर बुद्रूक ता. आंबेगाव येथील बाळू बाळा शेटे वय ६२ हे बेपत्ता झाले असून याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची खबर देण्यात आली आहे. सदर व्यक्ती कोठे दिसल्यास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याशी किंवा शेटे कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत त्यांचा मुलगा प्रवीण बाळू शेटे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बाळू बाळा शेटे वय ६२ राहणार पांडुरंगवस्ती काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव हे आषाढी वारीसाठी पंढरपूर या ठिकाणी गेले होते. दि.६/७/२०२५ रोजी सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील महाद्वार घाटावरून कुणालाही काही न सांगता बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहरात नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही तसेच आषाढी वारी संपल्यानंतर ते घरी ही न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ते मिसिंग झाल्याची खबर दिली आहे. बेपत्ता बाळू बाळा शेटे यांची उंची सहा फूट, रंग गोरा, बांधा मध्यम, नाक सरळ, चेहरा गोल केस काळे पांढरे, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट डोक्यावर पांढरी टोपी असा पेहराव असून सदर वर्णनाची व्यक्ती कोठे आढळल्यास पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे पुढील करत आहे.
प्रमोद दांगट – प्रतिनीधी