पारगावातील तरुणांनी २८ किलोमीटर पायी चालत घेतले केदारनाथ बाबांचे दर्शन


जिवंत पणी स्वर्ग अनुभवायचा असेल आयुष्यात एकदा तरी बाबा केदारनाथ, अमरनाथचे दर्शन घ्यावे असे या तरुणांनी सांगितले.

पारगाव ता. आंबेगाव येथील सात तरुण सहकाऱ्यांनी मिळून चारधाम यात्रा पूर्ण केली असून चारधाम मध्ये प्रथमता यमुनोत्री धाम पासून ट्रॅक ला सुरुवात करत यमुनोत्री यमुना नदीचे दर्शन घेण्यासाठी सात किलोमीटर अंतर पाई पार केले. नंतर गंगोत्री धाम गंगा मातेचे दर्शन घेतले.

गंगोत्री मातेचे दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ बाबाचे दर्शन घेण्यासाठी सोनप्रयाग पासून ते केदारनाथ बाबांचे दर्शन २८ किलोमीटर पहाडांमधून रस्ता काढत अडीअडचणी पार करत जागोजागी दरडी कोसळत होत्या, जसे जसे वरती जात होतो तशी तशी ऑक्सिजन लेवल देखील कमी होत होती, परंतु हार न मानता या तरुणांनी तब्बल दहा तास खडतर प्रवास करत केदारनाथ बाबांच्या मंदिरापर्यंत पोहोचून दर्शन घेतले. यावेळी श्री भोलेनाथ केदारनाथ बाबाचे दर्शन घेतल्यानंतर संपूर्णतः मरगळ व थकवा दूर झाला , जिवंत पणी स्वर्ग अनुभवायचा असेल तर केदारनाथ ला किंवा अमरनाथ ला जावे आयुष्यात एकदा तरी बाबा केदारनाथचे दर्शन घ्यावे असे या तरुणांनी सांगितले. या यात्रेत पारगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत लोखंडे, अनिल शेवाळे, ओंकार ढोबळे, अविनाश ढोबळे, एकनाथ कुटे, अतुल ढोबळे, या तरुणांनी सहभाग घेतला होता. बाबा केदारनाथ येथे दर्शन घेतल्यानंतर या सर्व तरुणांनी हर हर महादेव, श्री.छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम च्या गर्जना देऊन दर्शनाचा आनंद साजरा केला.

प्रमोद दांगट – प्रतिनिधी