मंचर शहरात गुन्हेगारी, विघातक कृत्यांना आळा घालण्याकरीता पवन सुधिर थोरात याला जेलमध्ये स्थानबध्द करणेबाबत मंचर पोलीसांनी सादर केला होता प्रस्ताव
मंचर ( ता. आंबेगाव) पोलीस स्टेशन हद्दीतील पवन सुधिर थोरात वय २५ वर्षे रा. मंचर, ता. आंबेगाव, या सराईत गुन्हेगार असून त्याचेवर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गर्दीमारामारी, अपहरण, अवैध वाळूचोरी, अवैध शस्त्रबाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. तसेच मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनने त्याचेवर यापुर्वी मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. पवन सुधिर थोरात याला वेळोवेळी गुन्हयात अटक करण्यात आली असून तो जामीनावर आलेवर प्रतिबंधात्मक कारवाई देखिल करण्यात आली आहे. परंतू त्याचे वर्तनूकीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती, सामान्य लोकांचे मनात त्याचेविषयी भिती निर्माण झाली होती. त्याचेवर वेळीच कायदयाचे बंधन राहावे तसेच त्याचे गुन्हेगारीला, विघातक कृत्यांना आळा बसावा घालण्याकरीता पवन सुधिर थोरात याला जेलमध्ये स्थानबध्द करणेबाबत पोलीस निरीक्षक मंचर पोलीस स्टेशन यांनी, मा. पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे प्रस्ताव पाठविला होता.
दि. ९/६/२०२५ रोजी मा जिल्हाधिकारी सो पुणे यांनी पवन सुधिर थोरात याचे स्थानबध्देचे आदेश पारीत केले असून पवन थोरात यास ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे जमा कऱण्यात आले आहे. मंचर पोलीस हद्दीत जो कोणी कायदयाचे उल्लंघन करील, जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करील अशा सर्व गुन्हेगारांवर मंचर पोलीस स्टेशन लक्ष ठेवून आहे. त्यांचेवर देखिल अशा प्रकारे योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे मंचर पोलीसांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रा), सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेश नलावडे, नितीन बनकर सहा. पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, पोलीस हवालदार संजय नाडेकर, शेखर भोईर, प्रणयकुमार उर्किंडे, शरद कुलवडे, नंदकुमार आढारी, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, योगेश रोडे, अजित पवार, तुषार अर्जुन, लखन माने यांनी केली आहे.