परप्रांतीय भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर गुन्हा दाखल 


मंचर शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी, परप्रांतीय नागरिकांचे बाबत राबविण्यात आली शोध मोहीम

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या परप्रांतीय भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात न देणाऱ्या घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील काळात भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा देखील मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचनेनुसार दहशतवादी विरोधी शाखा पुणे ग्रामीण व मंचर पोलीस यांनी मंचर शहरात दिनांक १७ रोजी परप्रांतीय, बांगलादेशी, पाकिस्तानी नागरीक अवैधरित्या वास्तव्यास असणारे व्यक्ती यांचा शोध मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी घरमालकांनी त्यांच्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, मतदान कार्ड, जन्म दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट, व्हिजा कागदपत्रे तपासणी दिवसभरात करण्यात आली असून या मोहिमेमध्ये बांगलादेशी व पाकिस्तानी व्यक्ती आढळून आली नाही. परंतु शोधमोहीम दरम्यान घरमालकाचे फ्लॅट खोल्यांमध्ये ठेवलेल्या भाडे करुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्याने माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा कायद्यानुसार काही घरमालकांवर चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व घरमालक व भाडेकरू यांना मंचर पोलिसांनी भाड्याने राहणारे व्यक्तीची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी अन्यथा घरमालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या आहेत. मंचर या ठिकाणी झालेल्या कारवाई पथकामध्ये सपोनी सुनील बडगुजर, पोलीस सब इन्स्पेक्टर यशवंत यादव, पोलीस उपनिरीक्षक राजेश नलावडे, महिला सहापोलीस उपनिरीक्षक प्रमिला भालेकर, पोलीस नाईक सुमित मोरे, पो. कॉ. अजित पवार, अविनाश दळवी, लखन माने, हनुमंत ढोबळे, पो. ह. उकिर्डे, विशाल गव्हाणे, मोसिन शेख पोलीस हवालदार, चंदनशिव दहशतविरोधी शाखा पुणे ग्रामीण पथक इत्यादी समाविष्ट होते.

प्रमोद दांगट – प्रतिनीधी