सहकारमहर्षी माजी आमदार स्व. दतात्रय वळसे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी मेळावा व किर्तनाचे आयोजन.


सहकारमहर्षी माजी आमदार स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, गिरगाव बु., परभणी यांचे सुश्राव्य किर्तन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन निरगुडसर ता. आंबेगाव येथे केल्याची असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

दरवर्षी १३ मे हा दिवस सहकारमहर्षी माजी आमदार स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या स्मृती व स्फूर्तीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने सायंकाळी ६.०० वाजता ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, गिरगाव बु., परभणी यांचे सुश्राव्य किर्तन व शेतकरी मेळावा होणार आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ निरगुडसर यांचें वतीने करण्यात आले आहे.