माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी घेतला मिसळचा आस्वाद


हॉटेल मयुरचे मालक पप्पू थोरात व कुटुंबीयांनी केले वळसे पाटलांचे स्वागत

राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी मंचर येथील मयूर हॉटेलमध्ये मिसळचा आस्वाद घेतला यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष, उद्योजक देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, मंचरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले, सुभाष मोरमारे, हे देखिल उपस्थीत होते. यावेळी हॉटेल मयूरचे मालक पप्पू उर्फ प्रणय थोरात, बाळासाहेब थोरात, शरद सहकारी बँकेचे संचालक दत्ता थोरात, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात आणि कुटुंबीयांनी वळसे पाटील व त्यांच्या बरोबर असलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.

माजी मंत्री वळसे पाटील, आढळराव पाटील हे मंचर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून मंचर आगारासाठी नवीन सुसज्य पाच एस टी बस मिळाल्या असून या एसटी बसचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी मंचर बस स्थानकावर आले होते. यावेळी मंचर शहरातील सर्वात जुने व नावाजलेले हॉटेल असलेल्या मयूर येथील प्रसिद्ध मिसळचा आस्वाद घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही. यावेळी वळसे पाटील यांनी हॉटेलचे आत हॉटेलमध्ये बसून मिसळवर ताव मारला. हॉटेल मयूर हे आंबेगाव तालुक्यातील मिसळ साठी प्रसिद्ध असलेले हॉटेल असून या हॉटेलमध्ये आंबेगावसह खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यातील अनेक मिसळ प्रेमी मिसळ खाण्यासाठी येत असतात. तसेच पुणे नाशिक महामार्गाने प्रवास करणारे अनेक प्रवासी येथील झणझणीत मिसळ खाण्यासाठी आवर्जून हॉटेलमध्ये येत असतात. वळसे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा मयूर हॉटेल ला भेट दिली आहे मात्र त्यांनी प्रथमतःच हॉटेलमध्ये बसून मिसळचा आस्वाद घेतल्याने आम्हाला देखील समाधान वाटले असे हॉटेल मयूर चे मालक पप्पू थोरात यांनी सांगितले.