आंबेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.६६ टक्के


प्रमोद दांगट – प्रतिनीधी 

आंबेगाव तालुक्यात या वर्षीचा लागलेला बारावीचा निकाल ९५.६६ टक्के कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखा मिळून २३८९ विद्यार्थी पैकी २३७४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील २२७१ विद्यार्थी उत्तीर्ण.

आंबेगाव तालुक्यात १०० टक्के निकाल लागलेली विद्यालये

१) श्री शिवाजी विद्यालय धामणी
२) हुतात्मा बाबू गेनू विद्यालय महाळुंगे पडवळ
३) श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी
४) शासकीय आश्रम शाळा गोहे बुद्रुक
५) विद्या विकास मंदीर विद्यालय अवसरी बुद्रुक
६) श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे
७) डेक्कन मराठा विद्यालय लांडेवाडी या विद्यालयांचा

इतर महाविद्यालयांचा निकाल

८) अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर निकाल ९४.२५ टक्के ( विज्ञान ९९.४० टक्के, कला ८७.९३ टक्के, वाणिज्य ९३.५६ टक्के )
९) महात्मा गांधी कनिष्ठ विद्यालय निकाल ९८.६९ टक्के ( विज्ञान ९९.०२ टक्के, वाणिज्य ९७.३३टक्के )
१०) जनता विद्यामंदिर घोडेगाव निकाल ९४.३५ टक्के ( कला ८७.२० टक्के, विज्ञान ९९.१९ टक्के, वाणिज्य ९६.७४ टक्के)
११) श्री भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय अवसरी खुर्द निकाल ८५.७१ टक्के ( कला ८० टक्के, वाणिज्य ९३.३३ टक्के )
१२) नरसिंह विद्यालय रांजणी वाणिज्य शाखा निकाल ८१.८१ टक्के
१३) श्री टी.एस बोऱ्हाडे विद्यालय शिरोली निकाल ९८.२४ टक्के ( विज्ञान १०० टक्के, कला ९७.८४ टक्के )
१४) पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर कला शाखेचा निकाल ९५.८३ टक्के
१५) श्रीमान निवृत्ती शेठ पवळे विद्यालय पेठ निकाल ८६.१५ टक्के ( विज्ञान १०० टक्के, कला ५८. ६२ टक्के, वाणिज्य ८६.३६ टक्के )
१६) कमलजादेवी विद्यालय कळंब कला शाखेचा निकाल ९४.४४ टक्के
१७) संगमेश्वर विद्यालय पारगाव शिंगवे ९९.३१ टक्के निकाल लागला असून विज्ञान व वाणिज्य शाखेचा १०० टक्के तर कला शाखेचा ९६.९६ टक्के निकाल लागला आहे.
१८) शिवशंकर विद्यालय तळेघर कला शाखेचा निकाल ७८.५७ टक्के
१९) दत्तात्रय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव ९७.२४ टक्के ( विज्ञान १०० टक्के, वाणिज्य ९३.०२ टक्के)
२०) जनता विद्यामंदिर कनिष्ठ विद्यालय घोडेगाव येथील निकाल ८५.२९ टक्के
२१) श्री भैरवनाथ माध्यमिक तांत्रिक व कौशल्य येथील निकाल ९३.१८ टक्के