विवीध स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सभारंभ संपन्न


अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथे गुरुवार दि.१ मे २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी खुर्द नंबर एक या शाळेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा झाला. याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मधील सुमारे ५३ विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.

एनएसएसई, मंथन, अभिरूप परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी खुर्द नं.१ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्यासाठी समस्त ग्रामस्थ अवसरी खु, शालेय व्यवस्थापन समिती, साईगणेश सेवा मंडळ अवसरी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक संतोष पोखरकर, अपूर्वा शेटे, प्रमिला धुमाळ, शैला सांडभोर, वैशाली जाधव, ललिता काळे, शंकर वारे या शिक्षकांना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करुन सन्मानित करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी इंदोरे यांच्या सेवापुर्ती समारंभा निमित्त अवसरी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने व शालेय व्यवस्थापन कमिटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी खुर्द नंबर एक यांच्या वतीने मुख्याध्यापिका मंदाकिनी इंदोरे यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती संतोष भोर, पोलीस पाटील संतोष शिंदे, अनिल शिंदे, दिनेश खेडकर, राजू भोर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मोहन शिंदे, सचिन ढोणे, नरेश भालेराव, अनिता टेमकर, श्रुती भोर, विजया भोर, सुवर्णा शिंदे, निलेश इंदोरे, बाबू ढोणे, सचिन अभंग इ मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे, सरपंच वैभव वायाळ, विस्ताराधिकारी चिमा बेंढारी, केंद्रप्रमुख विठ्ठल खेडकर, धोंडीभाऊ शिंदे गुरुजी, अपूर्वा शेटे इत्यादिनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मंदाकिनी इंदोरे याना सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पोखरकर यांनी केले तर आभार राजू भोर यांनी मानले.