मंचर : प्रतिनीधी
खडकी (ता. आंबेगाव) येथील आदर्श कीर्तनकार आदिनाथ महाराज जुन्नरकर यांची वारकरी साहित्य परिषदेच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. आळंदी येथील गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे धर्मशाळा श्री ज्ञानेश्वरी मंदिर या ठिकाणी वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेतील मासिक बैठक संपन्न झाली यावेळी जुन्नरकर यांना जिल्हाध्यक्ष हभप भाऊसाहेब हांडे महाराज यांनी निवडीचे पत्र दिले. या वेळी उपाध्यक्ष माउली आबा कुंजीर, हवेली तालुका अध्यक्ष विठ्ठल भाऊ गावडे, किसन महाराज तांबे, विलासदादा उंदरे, हभप तानाजी महाराज तांबे, हभप उद्धव महाराज कोळपकर, हभप विष्णु महाराज केंद्रे, ह.भ.प मिलिंद महाराज कोळपकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बैठकीत ह.भ.प भाऊसाहेब हांडे महाराज यांनी तालुका कार्यकारिणीच्या आढावा घेणे, कार्यकारिणीचा विस्तार करणे, तालुकास्तरीय नियुक्त्या करणे, महिला हरिपाठ मंडळाच्या कामकाजाची चर्चा करणे, वारकरी दिंडीला शासकीय अनुदान प्राप्त करून देणे यासह विविध विषयांचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यावेळी वारकरी साहित्य परिषद आंबेगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प आदिनाथ महाराज जुन्नरकर, व महीला तालुका अध्यक्ष कुसुमताई वाळुंज यांची निवड करून त्यांना निवडीचे प्रमाणपत्र वारकरी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ प. भाऊसाहेब हांडे महाराज, जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प माऊली आबा कुंजीर, हवेली तालुका अध्यक्ष ह.भ.प विठ्ठल भाऊ गावडे, ह.भ.प किसन महाराज तांबे, ह.भ.प विलास दादा उंदरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. याप्रसंगी दौंड तालुका अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब आटोळे, पुरंदर तालुका अध्यक्ष ह.भ.प मोहन महाराज पवार, मुळशी तालुका अध्यक्षा ह.भ.प. सौ. मनीषाताई महाराज गोळे, जुन्नर तालुका उपाध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज नवले, आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा ह.भ.प सौ. कुसुमताई वाळुंज, शिरूर तालुका अध्यक्ष ह.भ.प कारभारी महाराज गावशेते, हवेली तालुका सचिव पांडुरंग उंद्रे, पुणे जिल्हा सचिव ह.भ.प. तानाजी खराडे, हवेली खजिनदार शंकर काका वाबळे, ह.भ.प. लताताई हरगुडे, ह.भ.प मल्हारी आबा गावडे, ह.भ.प नीताताई कोतवाल, प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प संगीताताई उंद्रे, प्रा. सुरेश वाळेकर, सौ. सुप्रियाताई सरसे (मुळशी) ह.भ.प गणपत महाराज शिंदे, तालुका उपाध्यक्ष हभप कल्पणाताई रोडे आदी मान्यवर, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह.भ.प विठ्ठल काकाजी पाटील यांच्या पत्नी वैकुंठवाशी मालुश्री (दिदी) यांना पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पसायदानाने मासिक बैठकीचा समारोप करण्यात आला.
मी व आमचे कुटुंब गेल्या ५० वर्षापासून वारकरी सांप्रदायिक क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या ५ ते ६ पिढ्यांचा वारसा आहे. माझे चुलते ह.भ. प जयराम महाराज जुन्नरकर यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन घेउन मि आज या क्षेत्रात काम करत आहे. वारकरी सांप्रदायिक कामामुळे गुणवंत भूमीपुत्र, आदर्श कीर्तनकार पुरस्कार मिळाला असून गेल्या अनेक वर्षापासून आंबेगाव तालुका पायी दिंडी सोहळ्यात सहभाग घेत आहे. तसेच जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग, गावात गेली ४६ वर्ष श्री संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या हरिपाठावर होणाऱ्या कीर्तने, काकडा महोत्सव व तालुक्यात होणाऱ्या संस्कार शिबिरात सहभाग घेतं आहे. तसेच राज्यभरात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम, अखंड हरिनाम सप्ताह यादेखील सहभागी होत असून कीर्तनकार प्रवचनकार वारकरी मंडळींना मार्गदर्शन करत आहे. मला वारकरी साहित्य परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्षपदी काम करण्याची संधी जिल्हाध्यक्ष ह.भ.प भाऊसाहेब हांडे यांसह व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या संधीचे सोने करेल व कीर्तनकार, वारकरी यांच्यासाठी नेहमी काम करेल.
ह.भ.प आदिनाथ महाराज जुन्नरकर ( अध्यक्ष आंबेगाव तालुका वारकरी साहित्य परिषद )