टपरी चालवणाऱ्या दिव्यांग तरुणाचे खून प्रकरणी दोघांना अटक


मंचर पोलीसांची दमदार कामगीरी ; सहा तासात आरोपी गजाआड 

मंचर ता.आंबेगाव येथे महात्मा गांधी विद्यालयाजवळ टपरी चालवणारा दिव्यांग तरुण गणेश रवींद्र सोनवणे वय २८ रा. शितकलवस्ती मंचर यांचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना मंगळवार दि.२९ रोजी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी या खुनाचा छडा अवघ्या सहा तासात लावला असून या प्रकरणी दोन आरोपींना मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धेश संतोष रेनके वय १९ रा. जुना बैलबाजार बानखेलेमळा मंचर व विघ्नेश अशोक शेवाळे वय २० रा. लांडेवाडी ता. आंबेगाव असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

दिव्यांग तरुण रवींद्र सोनवणे वय २८ याचा खून झाल्याची घटना मंगळवार दिनांक २९ रोजी सकाळी उघडकीस आली होती. घटनेची माहिती करतात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे व टीम यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सहा तासाच्या आत सिद्धेश संतोष रेनके, व विघ्नेश अशोक शेवाळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी गुन्हा कबूल केला असून गणेश, सिद्धेश व विघ्नेश हे तिघे मित्र असून दिनांक २८ रोजी रात्री ते टपरी शेजारील असलेल्या जुन्या महिंद्रा गाडीत बसले असताना त्यांच्यात चेष्टा मस्करी सुरू असताना त्यांच्यात वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन घटनास्थळी असलेल्या बियरच्या बाटलीने गणेश याच्यावर वार करण्यात आले. पोटात व मानेवर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गणेशाचा घटनास्थळीत मृत्यू झाला असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले. सदर आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख सो, मा अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, सहा. फौजदार मांडवे, पोलीस हवालदार तानाजी हगवणे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस अंमलदार सुनिल काठे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार फिरोज मोमीन, पोलीस अंमलदार प्रदिप गर्जे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस आहेत अंमलदार लंके यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सनिल धनवे हे करीत आहेत.

प्रमोद दांगट – प्रतिनीधी