अवसरी बुद्रुक प्राथमिक शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी साचवलेल्या पैशातून शाळेला दिला अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही भेट


अवसरी : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुक्रवार दि. २५ रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला या निरोप संभारंभ कार्यक्रम प्रसंगी इयत्ता चौथीच्या मुला मुलींनी वर्षभर साचवलेले खाऊचे पैसे एकत्र करत शाळेला ६५ हजार रुपये किमतीचा ७५ इंची स्मार्ट टीव्ही भेट म्हणून दिला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या भेटीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ग्रामस्थ, सर्व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल्याची माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश हिंगे पाटील यांनी दिली.

याप्रसंगी चौथीच्या वर्गातील ९२ मुले, मुली त्यांना वर्षभर शिकवणारे वर्ग शिक्षक राम गुरव, श्रीमती जयश्री चव्हाण, सावकार अरगडे यांचा सत्कार पालकांच्या वतीने उभा पोशाख व विठ्ठल रखुमाई ची मूर्ती देऊन मानसन्मान करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश हिंगे, उपाध्यक्ष शुभांगी एलभर, सदस्य शांताराम शेटे, उमेश शिंदे, पवन हिंले, विकास गुनगे, अंकिता हिंगे, राजश्री डोंगरे, अजित चव्हाण सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर एलभर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या वतीने सर्व मुला, मुलींना तसेच त्यांच्या पालकांना जेवणासाठी खास आमरस पुरीचा बेत ठेवण्यात आला होता अशी माहिती मुख्याध्यापक हेमंत विटकर यांनी दिली.