आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार व पत्रकार क्षेत्रातील माझे मार्गदर्शक, गुरु श्री संतोषशेठ वळसे पाटील यांचा आज वाढदिवस प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आदरणीय संतोष शेठ वळसे पाटील यांच्या बद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. ते माझ्यासाठी आदर्श आहेत पत्रकारीता क्षेत्रात काम करत असताना अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो व आजही शिकत आहे. वळसे सर, व मी एकाच गावचे रहिवासी त्यांना मी कॉलेज जीवनापासून ओळखायचो मात्र सरांची माझी खरी ओळख व भेट माझे मित्र प्रफुल्ल मोरे यांच्या माध्यमातून झाली. पत्रकार क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने मी त्यांना बोलून दाखवले. व त्यांच्याबरोबर माझा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला.
संतोष शेठ वळसे पाटील हे अतिशय शांत, संयमी व मनमिळावू व्यक्तिमत्व लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये मिसळणारे, सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर हमखास मार्ग काढणारे व्यक्तिमत्व. वळसे सर गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारित क्षेत्रात काम करत आहे मात्र हे काम करत असताना कुटुंब, शेती याला देखील ते प्रथम प्राधान्य देतात. दररोज सकाळी लवकर उठणे, देवपूजा करणे व शेतीकडे फेरफटका मारून शेतीचे दिवसभराची कामे मार्गी लावणे, शेतातील कामगार लोकांना विविध सूचना, कामाचे नियोजन करून ते मंचर ऑफिसला दिवसभर बातम्यांचे नियोजन करतात.पुन्हा सायंकाळी घरी आल्यानंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, जेवल्यानंतर पुढील दिवसाच्या कामाचा आढावा घेऊन त्यानुसार टाईम टेबल तयार करुन ते कामाचे नियोजन करत असतात. एखाद्या कामाचे नियोजन कसे करावे ते काम कसे मार्गी लावावे हे वळसे सरांकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या कामाबरोबरच कुटुंबाला, मित्रांना, नातेवाईकांना ते नेहमी वेळ देतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी होउन अडीअडचणीला नेहमी उभे राहतात. आतापर्यंत संतोष वळसे पाटील यांना राज्य सरकारचे ११, राज्यातील विविध संस्थांचे ३८ आणि जिल्हास्तरीय संस्थांचे २२ पुरस्कार मिळाले आहेत. दैनिक पुढारी, प्रभात, केसरी, नवराष्ट्र, गावकरी, दैनिक भास्कर इत्यादी वर्तमानपत्रात ते नित्यनेमाने बातम्या पाठवत असतात. बातम्यांच्या माध्यमातून गोरगरीब, सर्वसामान्य, दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याचे काम ते नेहमी करत असतात हे मी जवळून पाहिले आहे. आंबेगाव तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले संतोष शेठ वळसे पाटील यांचा आज वाढदिवस असून त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
प्रमोद दांगट (पत्रकार)